ऐरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; प्रवासी जखमी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील एरोली परिसरात भर रात्री एसटीला मोठा अपघात झाला. प्रवासी साखर झोपेत असताना जोरात दणका बसला आणि काही समजण्याच्या आत बसचा भीषण अपघात झाला आहे. ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे बेलापूर रोडवर भरधाव एसटी थेट दुभाजकावर धडकली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर धडकल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे ते महाड असे ही एसटी जात होती. रात्री एक ते दीडच्या दरम्यान प्रवाशांनी भरलेल्या एसटीला आपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एसटीमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. अनेक वयस्कर प्रवाशी या बसमध्ये होते. प्रवासी झोपेत असताना अपघात झाला. त्यामुळे ते बेसावध होते आणि जास्त जखमी झाले होते.

Exit mobile version