| बेळगाव | प्रतिनिधी |
बेळगाव शहरातील एका बस चालकाने बसमध्येच गळफास घेत आपले जीवन संपवलं. बेळगाव शहरातील बस डेपोमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भालचंद्र एस तुकोजी, जि. बेळगाव असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील एका बस चालकाने बसमध्येच गळफास घेत आपले जीवन संपवलं. बेळगाव शहरातील बस डेपोमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भालचंद्र एस तुकोजी, जि. बेळगाव असे या बस चालकाचे नाव आहे. भालचंद्र यांना अनेक दिवसापासून पाठ दुखीचा त्रास होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान बसमध्येच आत्महत्या केल्याने परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.