| पनवेल | वार्ताहर |
वरूण बार कळंबोली येथे जेवणासाठी बसलेल्या चाळीस वर्षीय इसमाला मारहाण करून चाकूने कमरेजवळ आणि दंडावर वार केल्याप्रकरणी श्रीकांत सुरेश निकम आणि अनोळखी ईसमाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संदीप किसन मुळीक हे सेक्टर 3 इ, कळंबोली येथे राहत असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मुळीक आणि त्यांचा मित्र अजय हे वरूण बार, कळंबोली येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रीकांत निकम याला कॉल करून माल रेडी झाला आहे, ट्रेलर लोड करून घे असे सांगितल्यानंतर त्याने मी जाणार नाही असे बोलून फोनवर शिवीगाळ केली. त्यानंतर सव्वानऊच्या सुमारास श्रीकांत निकम व त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले आणि मुळीक यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि चाकूने डाव्या कमरेजवळ व हाताच्या दंडावर वार केले.