अंजुमन महाविद्यालयात कर्मचारी कार्यशाळा

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड-जंजिरा येथे कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी रविवारी विद्यार्थी प्रवेश व पात्रता यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी उप कुलसचिव सुवर्णा महाडिक, याना प्राचारण करण्यात आले होते.यावेळी त्यांनी कर्मचार्‍यांना प्रशासकीय कामांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यबिंदू मानून त्यांच्या सर्व समस्यांना सोडविण्यासाठी उचित सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी यांच्या नियोजनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी जुहेब मोदी, असिफ शेख, नवाब शेख, सुलतान मसालेवाले, नयुम शेख, संगीत धुमाळ, शेहजाद खान, रियाज काकर, शराफत शेख, सचिन उपाध्ये यांनी विशेष प्रयत्न केले.

Exit mobile version