| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग एसटी बस आगारातून सुटणारी अलिबाग-थळ बाजार एसटी बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. ही एसटी बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी थळ बाजार गावातील ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी ही बस थळ बाजार गावात येत होती. परंतु, एसटी महामंडळाने गावात येणारी बस बंद केली आहे. एसटी बस गावाच्या बाहेरूनच परत जाते. त्याचा नाहक त्रास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना होत आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे थळ बाजार गावातून बस सेवा सुरु करावी, तसेच गावात येणार्या फेर्यादेखील वाढविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.