पालीत शेकाप मेळाव्यास प्रारंभ

मान्यवरांचे आगमन, पुष्पवृष्टी,ढोल ताशांचा निनाद

| पाली | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्य 76 व्या वर्धापनदिन सोहळ्यास सुरुवात झाली असून, कुलाबा ढोलताशा पथकाच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. मेळाव्याचे मुख्य अतिथी युवराज संभाजी छत्रपती, आ. जयंत पाटील यांच्यावर फुलाचा वर्षाव करण्यात आला. काहींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी आ. बाळाराम पंडित पाटील,माजी मंत्री मीनाक्षी पाटील पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील, जिल्हा चिटणीस ॲड आस्वाद पाटील, प्रकाश मालवणकर, राहुल गायकवाड, किशोर ढमाले, सुरेश खैरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, लाल बावटे की जय, आ.जयंत पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसरा दुमदुमून गेला आहे.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

Exit mobile version