। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी खोपोली येथील डी. पी रोड वरील भव्य क्रीडांगणावर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आले. क्रिकेट खेळामुळे समाजात सांघिकपणाला बळ मिळते यामुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून राहते,खेळामुळे नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते, सर्व खेळाडूंनी खेळाडूंवृत्तीने खेळण्याचे आव्हान खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी खोपोली क्रिकेट अससोसिएशनचे यशवंत साबळे, सचिन मसुरकर, संजय तावडे, जयंत नाईक,राजेश पाटील, रमेश जाधव,चांद्रप्पा अनिवार,अविनाश तावडे,अँड.पंकज पंडित,शंकर दळवी,संदिप जोशी,कौस्तुभ जोशी,अबु जळगावकार,विनायक तेलवणे,नईम मुकरी,सुहास वरजकार,संजय सोळंकी,उमाशंकर सरकार, रोहित कार्ले सहा क्रीडा रसिक मान्यवर,खेळाडू उपस्थित होते.