राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई शहरचे किशोर, किशोरी गटाचे संघ जाहीर.

| मुंबई । प्रतिनिधी ।

पुणे येथे दिनांक 24जानेवारी पासून होणार्‍या “34व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी करीता मुंबई शहर कबड्डी असो. ने आज आपले पूर्व व पश्‍चिम असे दोन दोन संघ जाहीर केले. पश्‍चिम विभागाच्या मुलांच्या संघाचे नेतृत्व गोलफादेवी सेवा मंडळाच्या एरोन गुड्डेली कडे, तर मुलींच्या संघाचे नेतृत्व भारतमाता स्पोर्टस् क्लबच्या दृष्टी कुंभार हिच्याकडे सोपविण्यात आले. पूर्व विभागाच्या मुलांच्या संघाचे नेतृत्व न्यू परशुराम क्रीडा मंडळाच्या समर्थ काफर्डे कडे, तर मुलींच्या संघाचे नेतृत्व मुकादेवी स्पोर्टस् क्लबच्या खुशी आळवे हिच्या खांद्यावर सोपविण्यात आले. पाच दिवसांच्या सरावानंतर आज हा संघ स्पर्धेकरीता पुण्याकडे प्रयाण करेल.

पश्‍चिम विभाग मुले:- एरोन गुड्डेली(संघनायक), राज गुप्ता,श्रेयस पुलनुरी, साई सारंग, आयुष कनोजिया,ध्रुव मेस्त्री, पार्थ बामणे, कशिश खान,निलेश परब, विकास कनोजीया, तनिश पांगम, तनिश 
नागवेकर.
प्रशिक्षक :- तुकाराम तोडणकर, व्यवस्थापक :- संदीप काणेकर.

पश्‍चिम विभाग मुली:- दृष्टी कुंभार(संघनायिका), नेहा माळी, माऊली पार्टे, पायल कांचन, आर्या पाटील, चंदना नाईक, श्रेया साठे, गार्गी कोठेकर, स्वरा सावंत, सानिका शिगवण , मन्नत आदिवाल, साईक्षा पेडणेकर.
प्रशिक्षिका:- सुनीता जाधव. व्यवस्थापिका:- सुधा येसरे.

पूर्व विभाग मुले :- समर्थ काफड्रे(संघनायक), प्रेमकुमार दवणे, विराज कोंदवले, शिवांग मगर,सुंदरम गुप्ता, सर्वेश म्हस्के, निरंकर आगरकर, नेहान शेख, सार्थक मोरे, जोएलराज नाडार, अथर्व मोहिते, वेदांत क्षिरसागर.
प्रशिक्षक :- राकेश मेस्त. 
व्यवस्थापक :- मधुकर पाटील.

पूर्व विभाग मुली :- खुशी आळवे, सृष्टी गायकवाड, आर्या रावल, रिया कोंढाळकर, प्राची राऊत, कस्तुरी गुरव, खुशी शिंदे, गार्गी खोपकर, समीक्षा सांडव, काव्या कुमार, दिया घाडगे, संस्कृती जाधव.
प्रशिक्षक :- संदीप काळगावकर. 
व्यवस्थापिका :- नंदा बांदल.


Exit mobile version