। मुंबई । क्रिडा प्रतिनिधी ।
ठाणे येथे होणार्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरीता मुंबई शहरने आपले पश्चिम व पूर्वचे दोन्ही संघ जाहीर केले आहेत. नुकत्याच इराण येथे झालेल्या भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली सोनाली शिंगटेकडे मुंबई शहरच्या पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तर, सुशांत साईलकडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर साहिल राणे व तनु यांच्याकडे पूर्व विभाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
मुंबई शहर पश्चिम विभाग
महिला संघ:- सोनाली शिंगटे (संघनायिका), साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे, श्रद्धा कदम, प्रतिक्षा तांडेल, श्रेया साठे, जागृती घोसाळकर,सलोनी नाक्ती, प्राची भादवणकर, आचल यादव, रोझी डिसोझा, सोनाली नाईक.
पुरुष संघः- सुशांत साईल (संघनायक), रुपेश साळुंखे, ओमकार मोरे, अजिंक्य कापरे, हर्ष लाड, यश बगल, विनोद अत्याळकर, अवधूत शिंदे, सिद्धेश पिंगळे, सिद्धेश तटकरे, रुपेश कीर, अभिषेक रामाणे.
मुंबई शहर पूर्व विभाग
महिला संघ:- तनु (संघनायिका), सौंदर्या, नंदिनी मौर्या, श्रावणी घाडीगावकर, मेघा कदम, प्रीती हांदे, कादंबरी पेडणेकर, लेखा शिंदे, साक्षी सावंत, साक्षी जंगम, कशीश सावंत, जीवा.
पुरुष संघ:- साहिल राणे (संघनायक), संकेत सावंत, प्रणय राणे, रुपेश माहुरे, करण सावर्डेकर, जतिन विंदे, शार्दुल पाटील, केतन मापेलकर, अमन शेख, तेजस शिंदे, तेजस टक्के, यश पाटील.