| चिरनेर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दुरशेत येथील श्री गणेश कलामंच दुरशेत यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकेरी तसेच सामूहिक नृत्य प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. परीक्षक म्हणून निलेश म्हात्रे यांनी काम पाहिले. निलेश गावंड, सचिन गावंड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक हनुमान कला मंच उरण यांनी पटकाविला, विश्वरूप कला मंच वशेणी-उरण (द्वितीय) रोअर डान्स ग्रुप ठाणे (तृतीय) तर ओम साई डान्स ग्रुप पाली, धैर्य डान्स ग्रुप पनवेल व हर्षाली डान्स ग्रुप पेझारी यांना उत्तेजनार्थाची पारितोषिके देण्यात आली. एकेरी गटात आस्था दलवी व वेदा विजय यादव यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. द्वितीय क्रमांक आर्या नारंगीकर व हर्षिता कदम यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. श्रीजा पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच काव्या ठाकूर, रितिका शिंदे, आरोही लोळगे, दुर्वा धावरे, विहान नाईक, प्रिन्स म्हात्रे व सानवी कोठावळे यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. या नृत्य स्पर्धेसाठी पेझारी येथील बजाज ऑटोचे मालक शिवम वैभव ठाकूर यांनी विजेत्यांना सन्मानचिन्हे दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश कलामंचाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.







