शिक्षण सचिवांची शिक्षक परिषदेला भेट

। माणगाव । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय शिष्टमंडळाने दि. 3 ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव रणजीत देओल यांची मंत्रालयात भेट घेतली.

दरम्यान, शिक्षकांच्या अति प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करून त्यांनी निवेदन सादर केले. राज्यस्तरीय शिष्टमंडळात राज्य नेते रावसाहेब रोहकले गुरुजी, राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, राज्य कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे, राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रकाश चतरकर, राज्य कार्याध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे, राज्य संपर्कप्रमुख राजेंद्र नांद्रे, राज्य सहकार्यवाह विजय पाटील, राज्य कार्याध्यक्ष भरत मडके, नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गणेश वाघ, संजय कोंडविलकर, उदय गायकवाड, भिकाजी मांढरे, बालाजी गुबनरे आदींचा समावेश होता. यावेळी शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आवश्यक त्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात येऊन धोरणात्मक निर्णयाबाबत बाबी तपासून शिक्षकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला जाईल, असे सकारात्मक आश्‍वासन यावेळेस शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळास दिले.

Exit mobile version