रविवारी नागावमध्ये होणार राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने व निखिल मयेकर मित्रमंडळ नागांव तर्फे रविवारी (दि.25) सकाळी 9 वाजता संचालक मंडळ हायस्कूल नागांव, अलिबाग येथे राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, संचालक मंडळ हायस्कूलचे कार्याध्यक्ष एम.एन. पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य हेमंत राऊळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.

या परीक्षेत कबड्डीचे प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शिक्षक, कबड्डीप्रेमी सहभागी होऊ शकतात. जास्तीत कबड्डीप्रेमींनी या परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुकांनी अनिल राऊत 9823433364, प्रविण कदम 9765814343, मदन पाटील 9922393106 यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version