| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पाल्हे येथील ग्रामस्थ मंडळ, वनदेव क्रीडा मंडळ, जय भवानी मित्रमंडळ आणि सुशांती महिला मंडळ यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.23) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सदस्य राजेंद्र मयेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निखील मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्य लीना भगत, राजाराम बानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्तिक एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई उत्सवाचे औचित्य साधून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत निमंत्रित 32 संघाचा सहभाग असणार आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. कबड्डीची 40 वर्षाची परंपरा आजही जपली आहे. प्रथम क्रमांकाला रोख 21 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमाकांला प्रत्येकी दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ पक्कड करणाऱ्या खेळाडूला व शिस्तबध्द संघाला चषक दिला जाणार आहे.