| उरण | वार्ताहर |
अलिबाग येथे 18 वी जिल्हा स्तरीय अश टे डो स्पर्धेत उरणच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात क्रमांक पटकाविले. अभिज्ञा पाटील, वेदा पाटील, आर्या गावंड, वैदेही घरत, नैतिक गावंड, सृष्टीमोहन सरोज, यश पाटील, श्लोक ठाकूर, साक्षी पंडित यांनी प्रथम कमांक मिळविला आहे.
अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अश ते दो’ (आखाडा) या स्पर्धेसाठी या विजयी उमेदवारांची निवड झाली आहे. यांना मार्गदर्शन शिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, अनिषा घरत, राकेश म्हात्रे, अनिश पाटील, परेश पावसकर यांनी केले. उरण तालुक्यातील या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, त्यामुळे त्यांची निवड राज्यस्तरावर झाली. यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.