जुन्या पेन्शनसाठी तहसिलदारांना निवेदन

| वेणगाव । वार्ताहर ।
नवीन पेन्शन योजना रद्द करा व जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह व इतर अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हापरिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, ग्रामसेवक, वनविभाग कर्मचारी व शिक्षक यांनी मंगळवार (14) मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या वेळी भगवान घरत, गोवर्धन माने, राहुल डालिंबकर, समीर येरुंडकर, संतोष जांभळे, राजेंद्र फुलवरे, निकम योगेश्‍वर पितांबर आदींची भाषणे झाली.

बेमुदत संपात तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हापरिषद ,पंचायत समिती, महसूल, वनविभाग, आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामपंचायत, विविध निमसरकारी कर्मचारी, नगरपरिषद, नगरपालिका सर्व कर्मचारी, साफसफाई कंत्राटी कर्मचारी सर्व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले असून सर्व संगटनेच्या वतीने सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगड जिल्ह्याच्या नेतृत्त्वखाली तहसीलच्या मध्यमातुन शासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.

Exit mobile version