भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

खारघर गावात भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या महिला आणि तिच्या मुलीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

खारघर गावात दोन मुलींना सोबत घेऊन भीक मागणार्‍या महिलेने गावातील विश्‍वनाथ भगत यांच्या घरातील पहिल्या मजल्यावर मोठ्या मुलीला चोरी करण्यासाठी पाठविले होते. यावेळी भगत हे बाहेर गेले होते; तर त्यांची पत्नी देवघरात पूजा करीत होती.

यावेळी मुलीने घरातील मोबाईल व इतर साहित्य चोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण भगत यांच्या पत्नीला हा प्रकार समजल्याने त्यांनी चोरी करणार्‍या मुलीला रंगेहाथ पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

Exit mobile version