। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा परिसरातून अन्न, औषधे व प्रशासन विभागाच्या पथकाने छापा घालून सव्वा चार लाखाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून संबंधित व्यापार्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तळोजा गावामध्ये निसार अब्दुल हमीद मुल्ला यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याची माहिती अन्न, औषधे व प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता या पथकाला 3 हजार 405 वेगवेगळी प्लास्टिक पिशव्यांची मोठी पाकिटे सापडली. या पाकिटामध्ये असलेल्या 4 लाख 28 हजार 726 रुपये किंमतीच्या प्लास्टिकच्या पिशव्या ताब्यात घेतल्या.