। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठा या चार प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये मागील 16 दिवसात सुमारे 47 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे 80 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारी रोजी मोठी प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली प्रभागामध्ये प्लास्टिक पिशवी प्रतिबंध (सिंगल युझ प्लास्टिक) कारवाई दरम्यान रुपये 10 हजार हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला, या कारवाई मध्ये सुमारे 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे व कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर मागील पंधरा दिवसांमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ‘अ’, प्रभाग ‘ब’, प्रभाग ‘क’, प्रभाग ‘ड’मध्ये सातत्याने प्लास्टिक विरोधोत कारवाई केली जात असून, यावेळी सुमारे 38 किलोपेक्षा अधिक सिंगल युज प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर 5 हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर 10 हजार रुपये, तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर 25 हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.