| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील चौकर पाखाडी येथे दगड वाहतूक करणाऱ्या डंपरने महावितरण कंपनीच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी (दि.11) रोजी सायंकाळी सहा वाजता घडली आहे.
मुळगाव कोळीवाडा परिसरात ग्रोयान्स बंधाऱ्याचे काम सुरू असून, फॉरकॉन कंपनीने बंधाऱ्याचे कंत्राट घेतले आहे. गालसुरे येथील दगड खाणीमधून फॉरकॉन कंपनीचा दहा चाकी डंपर (एमएच 15 जेसी 6694) चौकर पाखाडी येथील अरूंद रस्त्यावरून मुळगाव कोळीवाडा येथे जात असताना चालकाच्या निष्काळजीपणाने डंपरची जोरदार धडक विजेच्या खांबाला बसली. या धडकेत खांब कोसळला असून, खांबावरील मुख्य वीजवाहिनी तुटल्याने शहरातील वीजपुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला होता.
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
