उरण लोकलला तुफान प्रतिसाद

पहिल्याच दिवशी तब्बल 96 हजार 580 रुपयांची कमाई

| उरण | वार्ताहर |

खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली आहे. या नव्या मार्गिकेवर अप-डाऊन मार्गावर एकूण 40 लोकल फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत.

खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर पहिल्या दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळाला. खारकोपर-उरण रेल्वे मार्गावरील लोकलमधून तब्बल सहा हजार 966 प्रवाशांनी लोकलने प्रवास केला आहे. उरण स्थानकातून 2130 तिकिटांची विक्री झाली असून, 2936 जणांनी प्रवास केला आहे. द्रोणागिरी स्थानकातून 1922, न्हावाशेवा स्थानकातून 1870 तर शेमटीखार स्थानकातून 238 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Exit mobile version