जगाला ‘वर्तमान’ देणारी नवदुर्गा

। अलिबाग । वर्षा मेहता ।
जगात असे असंख्या लोकं आहेत ज्यांच्या दिवसाची सरुवात ही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय होत नाही. वर्तमानपत्र हा समाजाचा खूप मोठा घटक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वर्तमानपत्र विकण्याविषयी बोलते तेव्हा त्याला वाटते की हा व्यवसाय आहे जो प्रामुख्याने पुरुष हाताळतात. पण, नेहमीच असं अस नाही. पण आमच्याकडे एक महिला आहे जी तिच्या पतीचे 27 वर्षांच्या वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सांभाळते. ही कथा आहे नयना उमेश पुजारी नावाच्या महिलेची.
नयना पुजारी यांची पुजारी पेपर स्टॉल नावाची हात गाडी आहे ज्याच्यावरते गेली 15 वर्ष पेपर विकत आहेत.त्यांचा स्टॉल हा बरोबर अलिबाग येथील शेतकरी भवनच्या समोर आहे. त्यामुळच्या गोंधळपाडा येथील रहिवासी. त्यांचे दुकान त्या रोज सकाळी 6 वाजता उघडतात व दुपारी 12 वाजता बंद करतात. पण त्यांची मेहनत इथेच थांबत नाही. दुपारी 12 वाजता दुकान बंद केल्यानंतर त्या अनेक ठिकाणी जेवण बनवायला पण जातात.
त्यांच्या पतीच्या मृत्युनंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांनी खुप कष्ट करुन त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुर्ण केले. यामध्ये त्यांना त्यांच्या नातेवायकांची चांगली साथ लाभली. व आज त्यांची मुलगी कम्प्युटर इंजिनिअर आहे तर सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. अशा रितीने अनेक अडचणींना सामोरे जात आयुष्याच चाकं फिरतं ठेवलं.
त्या स्वतः रोज वेगवेगळ्या ठिकाणी पेपर टाकायला जातात त्यामध्ये नगराध्यक्ष प्रशांत नाईक, बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोेरकर यांचा समावेश आहे. त्या कोव्हीड योद्ध्या देखील आहेत. कोरोना काळात पण एकही दिवस स्टॉल बंद न ठेवता त्यांनी लोकांपर्यंत वर्तमानपत्र पोहचवले आहेत. त्या म्हणाल्या की समाजात वर्तमानपत्राचे फार महत्व आहे. लोकांना वर्तमानपत्रात सविस्तर बातम्या कळतात व ते एका प्रकारे ज्ञानाचे स्त्रोत आहे.
गेल्या 15 वर्षांपासून त्या अथकपणे वृत्तपत्र विकण्याचा व्यवसाय करत आहे आणि समाजासाठी आपले योगदान देत आहे म्हणून निश्‍चितच त्या जगाला वर्तमान देणार्‍या नवदुर्गा ठरल्या आहेत.


वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय चालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पत्रकारांप्रमाणे आम्हालाही सुट्टी नसते. त्यामुळे वृत्तपत्रांच्या 3 ते 4 वार्षिक सुट्ट्या वगळता सर्व दिवस मी काम करते. पण जोपर्यंत मला हा व्यवसाय संभाळता येईल तोपरंत मी सांभाळीन. या व्यवसायामुळे माझी खूप लोकांसोबत ओळख झाली आहे.जे माझ्याकडून रोज मागची अनेक वर्ष वृत्तपत्र विकत घेत आहेत.
-नयना उमेश पुजारी, वृत्तपत्र विक्रेत्या

Exit mobile version