। उरण । वार्ताहर ।
उरण देऊळ वाडीत भटक्या कुत्र्यांनी अनेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा 30 ते 40 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शहरातील अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. देऊळ वाडीमध्ये भटक्या कुत्र्यांनी अनेकांवर हल्ला केला आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेकांनी इंदिरा गांधी सार्वजनिक रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. आजपर्यंत देऊळ वाडीत 30 ते 40 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही ते याकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.