माथेरानमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये मोकाट कुत्र्याच्या नाहक त्रासामुळे स्थानिकांना तसेच पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्यातरी इथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे पायी चालत जाणार्‍यांमध्ये भीती पसरली आहे.

दरम्यान, येथील नागरिक वसंत ढेबे हे इंदिरा नगर मेन गेटजवळ उभे असता कुत्र्याने त्यांच्या अंगावर उडी मारून खांद्याला चावा घेतला. दुखापत झाल्याने त्यांना ताबडतोब माथेरान बी.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या इंदिरा नगर भागात पिसाळलेल्या कुत्रीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाली आहे.

Exit mobile version