चिरनेर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

| चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर गावासह चिरनेर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून, त्यांचे चावण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवी वस्त्यांमध्ये या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. दरम्यान सकाळी शाळेत तर संध्याकाळी ट्युशनला जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये, कळपाने फिरणार्‍या या कुत्र्यांची, दहशत निर्माण झाली असून ,बाहेर पडताना या मुलांना धडकी भरते. श्री महागणपतीच्या मंदिर परिसरातील,भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही भटकी कुत्री मंदिर परिसरात विष्ठेची घाण करीत असल्यामुळे श्री महागणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तगणांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याशिवाय टोलक्याने दबा धरून बसलेली ही कुत्री रस्त्यावरून चालणार्‍या पादचारी नागरिकांच्या हातात असलेली, मटण मच्छीची पिशवी हातातून ओडबडून ,पळ काढीत आहेत. तर दुचाकी स्वराला गाठून त्याच्यावरही हल्ला चढवीत आहेत.

Exit mobile version