। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यात डेल्टा व डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असल्याने राज्य सरकार चौथ्या टप्यासाठी कडक नियमावली तयार करण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये लग्न कार्यासाठी सभागृहात 50 टक्के किंवा 100 जण, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 जण, अत्यावश्यक दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत व इतर दुकाने 4 वाजेपर्यंत आणि शनिवार, रविवार बंद, मॉल, सिनेमा गृह बंद, जीम, स्पा, सलून 4 वाजेपर्यंत 50 टक्के उपस्थिती, हॉटेल 4 वाजेपर्यंत 50 टक्के उपस्थिती, सरकारी, खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती, सार्वजनिक वाहतूक 100 टक्के मात्र उभे राहून नाही अशी नियमावली राहण्याची चिन्हे आहेत. कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरीता खबरदारी म्हणून राज्य सरकारने हे निर्बंध घालण्याची तयारी करीत असल्याची चर्चा होत आहे.