खोपोली पालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन स्थगित

। खोपोली । वार्ताहर ।
नगरपालिकेतील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने कामगार नेते,माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी 11 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरू केले होते.दरम्यान पालिकेची अत्यावश्यक सेवा,करवसुली,झेनिथ वॉटर फॉल  बंदोबस्त सुरू ठेवत पालिकेला सहकार्य केलं होतं. मुख्याधिकारी  अनुप दुरे यांनी सायंकाळी उशिरा आंदोलनकर्ते कर्मचार्‍यांशी चर्चा करून लेखी पत्र दिल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी दिली.
  

सकाळपासूनच पालिकेचे कर्मचार्‍यांनी आक्रामक भूमिका घेत सुरू केलेल्या कामबंद आंदोलनान महिला कर्मचार्‍यांसह सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी होते.सायंकाळी 7.30 मुख्याधिकारी अनुप दुरे यांचे दालनात बैठक घेण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक किशोर  भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष   दिलीप सोनवणे, कार्याध्यक्ष, विनोद सोनावणे,  उपाध्यक्ष, संतोष सोनवणे, सचिव विठोबा म्हत्रे,  उपसचिव रमेश विठ्ठल जंगम,  खाजीनदार, चंद्रकांत शिंदे, ऑडिटर,संतोष नवघरे, उपऑडिटर लक्ष्मण वाघमारे, प्रमुख सल्लागार, अशोक पवार, दिपक जांभुळकर,महिला प्रतिनिधी अरुणा मोरे, संगीता सोलंकी,सुजाता गायकवाड़ सर्व विभागतील कामगार कर्मचारी उपस्थित होते.मुख्याधिकारी आणि कामगार संघटना यांनी चर्चा केल्यानंतर सातव्या वेतनाचा 3 रा  हप्ता लवकरच देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार,मेडिक्लेमसाठी निविदा प्रक्रिया करणार, 12 आणि  24 वर्षाची योजना ही काही कर्मचार्यांनी पेपरची पूर्तता न केल्यामुळे बाकी होती ज्या कर्मचार्‍यांचे कागदपत्रे जमा करावीत, 2005 च्या नंतर च्या सर्व कर्मचार्यांचे 45 लाख रुपये पीएफए भरणार असल्याचे सांगितले, सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्या वर त्यांची देनी त्वरित देण्यात येतील, कंत्राटी कामगारांना शासनाकडून अनुदान आले की लगेच त्यांचे बिल काढले जातील अशा विविध मागण्यांवर मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे आणि कामगार प्रतिनिधी यांनी सखोल चर्चा केल्यानंतर दुरे यांनी सकारात्मक लेखी पत्र दिल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेतले असल्याचे अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी सांगत सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी होत सर्वांनी एकजुट एकता दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
    

सातवा वेतन आयोगातील एक आणि दुसरा हप्ता  देण्याचे आदेश  आले असतान त्याच दिवशी दिलेत आता तिसर्‍या ह्प्त्याची  मागणी आहे परंतु नगरपंचायत संचालनालयाकडून परवानगी आली की देण्याची व्यवस्था केली जाईल.  नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता मेडीक्लेम देणे शक्य नाही परंतु स्थानिक कंपन्या,बँका यांच्या सीएसआर फंड मिळेल का प्रयत्न करतोय अन्यथा नगरपालिका फंडातून निविदा प्रक्रिया करू तसेच वर्षानुवर्षे कपातील देणी बाकी आहेत यात तथ्य आहे.ते टप्प्या टप्याने देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Exit mobile version