। उरण । प्रतिनिधी ।
उरण शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे चिन्ह असलेल्या शिट्टीचा जोरदार प्रचार करण्यात आला. आनंद नगरमधून निघालेली रॅली उरण करंजा रस्ता, खिडकोली नाका, बक्षी कॉम्प्लेक्स, जरी मरी मंदिर मोहल्ला, राजपाल नाका, फुल मार्केट, वैष्णवी हॉटेल, सातराटी, कामठा परिसर ते कामगार वसाहतीपर्यंत नेण्यात आली.
यावेळी उरणमधील औद्योगीकरणांमध्ये नोकर्यांना संधी तसेच शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर प्रीतम म्हात्रेच आमदार हवेत, अशी भावना येथील जनतेने प्रचारादरम्यान बोलून दाखवली. या रॅलीत दुकानदार व नागरिकांनी प्रीतम म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शेकापचे चिन्ह असलेल्या शिट्टीच्या आवाजाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
या रॅलीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत, पदाधिकारी शंकर भोईर, माजी नगरसेविका लता पाटील, संघटिका सुप्रिया म्हात्रे, लक्ष्मीबाई कांबळे, उपाध्यक्ष रंजना पाटील, दीपा कोळी, सलीम बॅटरी, अशोक कोळी, लहू शिंद,े राजश्री मुंबईकर, सनी म्हात्रे, हितेश जोशी, ओविस पटेल, प्रिया शहा, कुंदन पाटील, विलास बर्गे, लता वारीक, प्रियांका पाटील तसेच शेकापचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.