शेकापमध्ये जोरदार इनकमिंग

दिपक ठाकूर आणि समर्थकांचा जाहीर प्रवेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

ग्रुप ग्रामपंचायत कावीर हद्दीतील बोरपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक हरिश्‍चंद्र ठाकूर तसेच त्यांच्या गावातील त्याचे असंख्य सहकार्‍यांनी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, कावीर ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रेरणा कदम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.

शेतकरी कामगार पक्षामार्फत कोणत्याही प्रकारे पक्षभेद न करता सर्वांसाठी अहोरात्र मेहनत घेऊन मदत केली जाते, गरजेला उपयोगी पडणारा पक्ष अशी शेकापची प्रतिमा आहे. आमदार जयंत पाटील, युवा नेतृत्व चित्रलेखा पाटील यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाबद्दल असलेली जाण, काम करण्याची धडाडी या कार्यप्रणालीवर खुश होऊन दीपक ठाकूर तसेच त्यांच्या गावातील त्याचे असंख्य सहकानी जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रचना भगत, मोहिनी भगत, प्राप्ती पाटील, सतिश भगत, मोहिनी मानकर, प्रशांत पाटील, किशोर भगत, मोहन भगत, प्रभाकर मानकर, मधुकर ठाकुर, अविनाश ठाकुर, रत्नेश कदम इतर पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

Exit mobile version