शेकापमध्ये जोरदार इन्कमिंग; लोहा येथे असंख्यांचा पक्षप्रवेश

| लोहा | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणाली आणि विचारधारेवर विश्वास ठेवत शंभरगाव, ता. लोहा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी शेकाप प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी ढोल-ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी केली.

यावेळी आ. शिंदे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष हा सदैव शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे लोकांचा विकास, समाजाचा विकास आणि गावाचा विकास ही आहेत. यावेळी आ. शिंदे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सरपंच शंकर बापुराव भोंग, उपसरपंच देविदास सखाराम लोखंडे, व्यंकटी मुंजाजी कोडेवाड, संदीप व्यंकटराव भोंग, शिवाजी भोंग, अनिल डाकोरे, काळेश्वर देवडे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ लक्ष्मण भोंग, तंटामुक्ती उपाध्यक्ष यशवंत हरी बनसोडे, बालाजी एकनाथ भोंग, लक्ष्मण भोंग, किशन भोंग, आनंद भोंग, प्रकाश भोंग, प्रल्हाद भोंग, सदाशिव देशमुख, तुकाराम उमाजी यांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बालाजीभोंग, भगवान पवळे, पुंडलिक पाटील, बोरगांवकर सरपंच, शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, सचिन कुदळकर, विक्रम मोरे, उपसरपंच जोशी सांगवी, प्रदीप नंदनवनकर, सुनील जाधव, विजय जाधव, बळीराम गोमस्कर, व्यंकट आढाव, जमीर पठाण, सिकंदर शेख, नामदेव शिंदे, सचिन लोहकरे, रामेश्वर लोहकरे, भगवान मोरे, माली पाटील, माधव मोरे, राजधर मोरे, रोहीदास जाधव, व समस्त शंभरगाव गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version