युरो आशिया कराटे स्पर्धेत मुरुडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

| कोर्लई । वार्ताहर ।
मुंबई येथे 11, 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय यूरो आशिया कराटे स्पर्धेत मुरुडमधील कराटे खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सहा आंतरराष्ट्रीय पदक मिळवून कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या स्पर्धेत विहूर येथील इकरा इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी हुसेन फैसल उलडे याने 10 व 11 वयोगटात एक सुवर्ण व एक कास्य पदक तर महंमद नावेद उलडे याने एक सुवर्ण व एक कास्य पदक तर मजगांवच्या नज हायस्कूलचा विद्यार्थी अलहान अन्सारी याने पाच व सहा वयोगटात एक सुवर्ण व एक कास्यपदक मिळविले. सदर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक साहिल अन्सारी व फैसल उल्डे हयांचे मार्गदर्शन लाभले.यास्पर्धेत 22 देशातील 1200 खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

Exit mobile version