मोरया साई पथकाची जोरदार तयारी

| उरण | प्रतिनिधी |

गोपाळकाला सण जवळ आला असून सोमवारी (दि.26) श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी (दि.27)गोपाळकाला सण आहे. या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून विविध गोविंदा पथकाची सुद्धा रात्रंदिवस तयारी सुरू आहे. विशेषतः संध्याकाळी तसेच रात्री कामावरून तरुण वर्ग घरी आले की गोपाळकाला अर्थातच दहीहंडी फोडण्याचा सराव करत असतात. एकमेकांवर थर रचून मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा सराव केला जातो.

यातच उरण तालुक्यातील नवघर कुंडेगाव कोळीवाडा येथे मोरया साई गोविंदा पथकातर्फे दहीहंडीची जोरदार तयारी सुरू आहे. कुंडेगाव कोळीवाडा गावातील बालगोपाळ व तरुणांचा या पथकात समावेश आहे. जास्तीत जास्त बक्षीसे मिळविण्यासाठी व आपल्या पथकाचे नाव अग्रेसर राहावे यासाठी मोरया साई गोविंदा पथक कार्यरत आहे. या पथकाचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष राकेश चोगले, खजिनदार धर्मेंद्र चोगले आहेत. तर, प्रशिक्षक प्रशांत बाळकृष्ण कोळी हे या पथकाला उत्तम असे मार्गदर्शन करत आहेत. तसेच, शिवसाई राम 2828, फोस्टर ग्रुप, श्री साई गणेश पदयात्री, ब्रह्मा बॉईज, बाप्पा मोरया ग्रुप, मोरया साई ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कुंडेगाव कोळीवाडा आदींचे सहकार्य या गोविंदा पथकाला लाभत आहे.

Exit mobile version