| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष खारघर यांच्या वतीने माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीनिमित्त खारघर शहरातील शाळेमधील दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्कर्ष हॉल खारघर येथे संपन्न झाला. यावेळी, खारघरमधील शाळेतील दहावी व बारावीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शक विजय नवले यांचे व्याख्यान ठेवले होते. याचा लाभ उपस्थितांनी घेतला.
यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. बाळाराम पाटील, पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, नगरसेविका लीना गरड, पनवेल विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष अजित अडसुळे आदी मान्यवरांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेकाप महानगरपालिका जिल्हा युवक अध्यक्ष कल्पेश तोडेकर, समन्वयक रा.गो. पाटील, खारघर चिटणीस बापू मोरे, राम करावकर, नरेश पाटील, प्रतीक ढोबळे, जयेश कांबळे, जगदीश घरत, किरण जाधव आणि अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
खारघर येथे शेकापकडून विद्यार्थ्यांचा सत्कार
