विद्यार्थ्यांचा पोलीस ठाणेतर्फे सन्मान

| तळा | वार्ताहर |

नाकों को-ऑर्डीनेशन सेंटर समिती जिल्हा-रायगड आयोजित संकल्प नशामुक्तीचा पोस्टर्स व निबंध स्पर्धा-2024 चे गो. म. वेदक विद्यामंदिर आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी ‘व्यसनाधिनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पोस्टर व निबंध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोस्टर स्पर्धेत अंश विनोद कोलवणकर प्रथम, जान्हवी रमेश साळवे द्वितीय तर संस्कृती गणपत कांबळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, ज्युनियर कॉलेजने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत रितेश राजेश नागे प्रथम, जयश्री किशोर काप द्वितीय तर श्रुती महेश ठाकूर हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तळा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ढाकणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड व प्राचार्य दिलीप ढाकणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट वापरताना योग्य त्या प्रमाणात वापर करावा, मोटार सायकल चालवताना सर्व नियमांचे पालन करावे, मोबाईलवर आलेल्या फसव्या मॅसेजना रिप्लाय देऊ नये असे गणेश कराड यांनी सांगितले.

Exit mobile version