विद्यार्थ्यांनी साकारला बाप्पा

माध्यमिक शाळा वायशेत प्रात्यक्षिक शिबीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालय, अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान, जितनगर महाराष्ट्र आयोजित निर्मल गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दि. 26 ऑगस्ट रोजी माध्यमिक शाळा वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणपती कसे बनवायचे, याचे प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि तहसीलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिबीर पार पडले.

दरम्यान, थळ येथीलमूर्तिकार एकनाथ थरोंडेकर यांनी मातीपासून घरच्या घरी गणेश मुर्ती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले..या कार्यक्रमास अध्यक्ष एकनाथ थरोंडेकर, राजाराम हुळवान, विशाल आढाव, गौरव माळी, तहसील कार्यालय अलिबागमार्फत पवन मस्के, शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभाग घेतला व मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरू असा निर्धार विद्यार्थी व उपस्थितांनी यावेळी केला.

Exit mobile version