| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर येथील श्रीम. बामिबाई नाना पुनकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षा रॅली बोरघर ते रामराज अशी काढण्यात आली. यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो.नि. देवा मुपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत आठवी ते विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, वाहतूक सुरक्षा संदेश पोहोचविताना विद्यार्थ्यांनी वाहने जोरात चालवू नका, मानव जन्म पुन्हा नाही, वेगाने वाहने चालवून मृत्यूस आमंत्रण देऊ नका, कदर व्हावया तुमच्या प्राणाची, आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची, होईल दोन मिनिटाचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित आदी घोषणा देत जनजागृतीचा प्रयत्न केला.
दरम्यान, निरीक्षक देवा मुपडे, उपनिरीक्षक नंदगावे, पोलीस कर्मचारी माळी यांच्यासह आरएसपी समादेयक किशोर राठोड, मुख्याध्यापक रवींद्र ठाकूर, शिक्षक योगेश तांबोळी, संतोष ठाकूर, नरेंद्र पाटील, डी.व्ही. रसाळ, पी.पी. लोखंडे, संजय टिवळेकर, प्रमोद शिर्के आदींनी सहभाग घेतला.