। रायगड । प्रतिनिधी ।
अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळण्याच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रायगड सुनील जाधव यांनी केले आहे.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अल्पसंख्याक समुदयातील घटकतील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे. पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचाच अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. एकाच कुटूंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदरील वेबसाईट वरुन अटी व शर्ती व अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 फेब्रुवारीपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे सादर करावेत.