। रायगड । खास प्रतिनिधी ।
राज्यात विविध राजकीय पक्षांची सत्ता आली आणि गेली. मात्र, मुंबई-गोवा या महामार्गाचे काम हे रखडलेलेच आहे. किती मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासरकीय अधिकार्यांनी या महामार्गाची पाहणी केली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गुरुवारी नवनिर्वाचीत सार्वजनिक बांधकम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वसन त्यांनी दिले.
हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगायला मंत्री शिवेंद्रसिंहराजे विसरले नाहीत. गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्वांना या महामार्गाची आठवण होते. कारण, याच कालावधीत कोकणवासियांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगून सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिकार्यांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
या दौर्याच्या सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने नेमकी महामार्गाची सद्यःस्थिती काय आहे याच्या पाहणीसाठी आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम का रखडले याची माहिती घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम आजही अपुर्णावस्थेत आहे. मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोणत्याही स्थितीमध्ये महामार्गाचे पुर्ण केले जाईल असा दावा केला होता. परंतू अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. तर अनेक ठिकाणी भूसंपादनाच्या प्रश्नामुळे काही ठिकाणी काम ठप्प आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या 281 किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी अंडरपास रस्ता, अंतर्गत रस्त्याना जोडणारे मार्ग निर्माण करावे लागणार आहेत. तसेच पेणमधून बाहेर पडताना अलिबागकडे जाताना मोठ्या वाहनांना सहजपणे वळता येत नाही. अशा ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तो निधी देखील लवकरच मंजर करुन कामे मार्गी लावली जातील.
मंत्री शिवेंद्रराजेसिंहराजे भोसले