ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अभ्यास शिबीर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आयटक प्रणित, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर नुकतेच अलिबागमध्ये झाले. जिल्हाध्यक्ष कॉ. मंगेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिराचे उदघाटन डॉ. राजेंद्र गोरे यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे, कॉ.नामदेव चव्हाण, कॉ. राहुल जाधव होते. या शिबीराला प्रमुख उपस्थिती कॉ. सुहासिनी मोकाशी, कॉ. मिलिंद गणवीर यांची होती.

पुरोगामी – सामाजिक कार्यकर्त्या इंजिनिअर कॉ. मोहिनी गोरे (ठोंबरे) यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या पहिल्या सत्रात प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे यांनी मार्क्सवाद व फुले, शाहू, आंबेडकर या विषयावर मार्गदर्शन केले. कामगार कायद्याचे अभ्यासक ॲड. राहुल जाधव यांनी बदलते कामगार कायदे आणि संघटनेचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

शिबीराच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. तानाजी ठोंबरे यांनी जात, वर्ग व समाज या विषयावर सांगितले, कीजात आणि धर्म या पलिकडे जाऊन कामगारांनी वर्गीय जाणीव जागृत करणे आवश्यक आहे. कॉ. नामदेव चव्हाण यांनी सरकारचे कामगार विरोधी आर्थिक धोरण या विषयांवर अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. शिबिराच्या अंतिम सत्रानंतर महासंघाचे पदाधिकारी आणि निमंत्रित सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.

यावेळी कॉ. सखाराम दुर्गुडे, ए .बी. कुलकर्णी, बबन पाटील, शाम चिंचणे, निळकंठ ढोके, उज्वल गांगुर्डे, गोविंद म्हात्रे, चत्रुघ्न लांजेवार, सचिन गाडेकर, संतोष चव्हाण, अरुण देसाई, रमेश तांडेल, विजय कदम आदी पदाधिकारी व राज्य कार्यकारिणी सदस्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थी-ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version