| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील मुलांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून अधिकारी बनले पाहिजेत. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तांबाटी ग्रामपंचायतीने गोदरेज एंटरप्राईजेस ग्रुपच्या सामाजिक दायित्व उपक्रमातर्गंत गावात अभ्यासिका आणि वाचनालय केंद्र सुरू केले आहे. गुरुवारी (दि.25) जून रोजी उद्घाटन करण्यात आले. तांबाटी ग्रामपंचायत स्पर्धा परिक्षा अभ्यासिका केंद्र सुरू करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे, खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन पवार, संतोष बैलमारे, प्रमिला पाटील, आर.बी. गायकवाड, महेश पाटील, ज्ञानेश्वर सुतार, भाग्यश्री सावंत, जितेंद्र सकपाळ, अविनाश आमले, प्रशांत कदम, अरुणा सावंत, नितीन कदम, संतोष दळवी, हरिभाऊ जाधव, रितेश मोरे, सुरेश पवार, प्राजक्ता पाटील, सुगंधा जाधव, अस्मिता कदम, शितल पाटील, कविता मिरकुटे यांच्यासह ग्रामस्थ महिला व विद्यार्थी उपस्थित होते.







