पोलीस उपनिरिक्षक स्व. जितेंद्र वाटवे यांची उद्या शोकसभा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांचे बुधवारी (दि.20) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पुण्यानुमोदन व शोकसभा रविवारी (दि.31) सकाळी 11 वाजता माणगाव-निजामपुर मार्गावरील कुणबी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संदिप वाटवे, साहिल वाटवे, वाकडाई नगर रहिवासी मंडळ तसेच प्रज्ञा विकास बौद्धजन मंडळ, माणगाव तथा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.6 यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version