| चिरनेर | प्रतिनिधी |
इंटरनॅशनल इनडोअर स्टेडियम हल्दवानी नैनिताल येथे उत्तराखंड तायकवांडो असोसिएशन व तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ओपन राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 29 ते 31 मे 2026 रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय पंच व 7 वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची यांची तायकवोंडो खेळात निस्वार्थी तायकवोंडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणुन निवड झाली आहे. तसेच, रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणून देशात व परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व त्यांच्या अनुभवाचा फायदा खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातून उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधिकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांची हल्दवानी नैनिताल येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा प्रमुखपदी नेमणूक केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पदाधिकारी, प्रशिक्षक व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुभाष पाटील स्पर्धा प्रमुखपदी
