राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेरळच्या खेळाडूंचे यश

| नेरळ | प्रतिनिधी |

उल्हासनगर येथे राष्ट्रीय बुदोकोन कराटे असोसिएशन कडून राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नेरळ येथील कराटेपटू यांनी मोठे यश संपादन केले. उल्हासनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत मोठ्या प्रमाणात राज्यभरातून कराटे पटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नेरळ येथून सहभागी झालेल्या कराटेपटू यांनी मोठी भरारी घेत यश संपादन केले. स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूमध्ये नेरळ येथील समृद्धी सोनवणे, कस्तुरी भोईर यांनी सुवर्ण पदकासह रौप्य पदकाला देखील गवसणी घातली. त्याचवेळी रौप्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये मधुरा गवळी, स्वराज विरले, श्रेया गवळी, प्रणाली विरले, परी डायरे, माही थवई यांनी एकाच वेळी दोन पदके मिळवली. तर निरंजन घुले, ऋत्वि कोळंबे यांनी देखील पदके प्राप्त केली आहेत. सर्व पदक विजेते खेळाडू प्रशिक्षक हिरामण गवळी, नंदू म्हसकर आणि मानसी थवई यांचे नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.

Exit mobile version