| नेरळ | वार्ताहर |
मुंबई येथे पार पडलेल्या 29 युरो आशिया इंटरनॅशनल वास्को ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नेरळमधील सन बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांनी 13 पदकांची कमाई केली आहे.
मुलुंड येथील कालिदास सभागृहात रविवारी (दि.4) 29 युरो आशिया इंटरनॅशनल वास्को ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नेरळ येथील सन बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. अकादमीचे शिक्षक हिरामण गवळी व संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरा गवळी हिने 2 रौप्यपदक, कौशल गवळी 2 रौप्यपदक, मानसी थवई 1 सुवर्ण 1 रौप्यपदक, ज्ञानेश्वरी मसणे 1 सुवर्ण 1 रौप्यपदक, स्पुर्वा सावंत 1 रौप्य 1 कांस्यपदक, नील गार्मी 1 सुवर्णपदक, झारा शेख 1 रौप्य 1 कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेत यश मिळविल्या बद्दल विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.