| महाड | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपूर्वी महाड नगरपालिकेच्या 13 नगरसेवकांनी शहरातील अतिक्रम हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर अखेर बुधवारी (दि.25) महाड नगर परिषदेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच एसटी बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईला विलंब होत असल्याने महाडकरांमध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर होता. राजकीय हितसंबंधांमुळे या कारवाईत अडथळे येत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली होती. त्यावर 20 मार्च नंतर या कारवाईला सुरुवात होण्याचे संकेत प्रशासनाकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार बुधवारी महाड शहरातून ही कारवाई सुरू झाल्याचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले.
शहरातील अतिक्रमणे हटवण्यात यश
