काव्य-प्रयासने पटकाविला प्रथम क्रमांक
। वाघ्रण । वार्ताहर ।
कोएसो ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाड येथे शनिवार, दि. 27 ऑगस्ट रोजी गुणवत्ता मूल्यमापन लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रायगड विभागाचे स्टँडर्ड क्लबचे प्रमोशन ऑफिसर पुष्पेन्द्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत काव्य पाटील या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दुर्गम विवेक रेड्डी, डेप्युटी डायरेक्टर बी आय एस व शुभम चौधरी, असिस्टंट डायरेक्टर, बीआयएस हेसुद्धा उपस्थित होते. नाना पाटील हायस्कूल पोयनाडच्या बीआयएस स्टँडर्ड क्लबमधील सर्व सभासद यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दुर्गम रेड्डी यांनी बीआयएस मेंबर यांना आयएसआय नामांकन व हॉलमार्क नामांकन कसे केले जाते, यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये हॉलमार्क व आयएसआय नामांकन याबाबतची जनजागृती व्हावी म्हणून भारत सरकारने हा उपक्रम राबविलेला आहे, याची माहिती दिली. याची सुरुवात शाळेतील मुलांपासूनच व्हावी या हेतूने हा कार्यक्रम घेतला जात आहे, शिवाय गुणवत्ता मूल्यमापन कसे होते व ते का आवश्यक आहे, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापक कमलाकर फडतरे यांनी बीआयएसचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व भविष्यात आयएसआय नामांकन व हॉलमार्क स्टँडर्डच्या वस्तू विद्यार्थ्यांनी विकत घ्याव्या, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी विज्ञान शिक्षक उदय पाटील, श्री. स्वामी, श्री. विभव दळवी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक काव्य पाटील व प्रयास पाटील, द्वितीय अनुज पोद्दार, अंकित ठाकूर, तृतीय क्रमांक अंजली पाटील, सिमरन परब, साक्षी जगताप यांनी मिळविला. तर, सोनल म्हात्रे, सिद्धी पेडवी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्यांना विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन शाळेचे बीआयएस प्रमुख समाधान भंडारे यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.