जयेश चौधरी याचे यश

नगराध्यक्षांनी केले कौतुक
। पनवेल । वार्ताहर ।
येथील रूद्र जयेश चौधरी (8) या चिमुरड्याने थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशनच्या वतीने गोवा येथे आयोजित 12व्या राष्ट्रीय थाई बॉक्सींग चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत कास्य पदक पटकावले आहे. या त्याच्या यशाबद्दल पनवेल शहराचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी रूद्र याचे कौतुक करत त्याचे तथा त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि. चे डायरेक्टर अनंत म्हात्रे आणि विजय म्हात्रे उपस्थित होते. यासमयी प्रितम म्हात्रे यांनी रूद्र चौधरी यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून भविष्यकालात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आपली जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था नेहमी सोबत आहे, असे आश्‍वासन रूद्रच्या पालकांना दिले आहे.

Exit mobile version