राज्यस्तरिय कराटे स्पर्धेत कर्जतच्या कराटेपट्टूंचे यश

। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कर्जतच्या कराटेपट्टू यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकुण 530 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स या गटवारीमध्ये स्पर्धकांचा मोठा सहभाग होता. काता प्रकारामध्ये भुषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे यांनी सुवर्ण तर धिरज कांबळे, सुरज दातिर, आरोही देशमुख या खेळाडूंनी यांनी रौप्य पदक मिळविले आणि पायल भोसले या विद्यार्थीनीने कास्य पदक पटकावले. स्पर्धेतील कुमिते (फाईट) या प्रकारात कबीर वारंगे या कराटेपट्टूने सुवर्ण पदकाची कमाई केली. या वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत कर्जत तालुक्यातील खेळाडूंनी एकूण 12 पदकांची कमाई केली. यामध्ये आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कास्य पदक पटकाविले आहेत. पदक विजेते खेळाडू हे रेन्बो बुडोकॉन कराटे अकॅडमीमध्ये वसंत शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक नरेश बडेकर, विशाल गायकवाड यांच्याकडून कराटे मधील डावपेच शिकत आहेत.

Exit mobile version