उरणच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत सुयश

। उरण । वार्ताहर ।
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोनगाव भिवंडी, मुंबई येथे ठाणे रायगड मुंबई या जिल्ह्या पुरत्याच मर्यादित असलेल्या स्पर्धेत उरणचा शुभम म्हात्रे 18- 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये ग्लोड मेडल पटकाविले तर निशांत पांडे 16- 100 मीटर गोल्ड मेडल, मयुरी चौव्हान 14- 800 मीटर गोल्ड मेडल, 100 व 200 मीटर ब्राँझमेडल, चिराग म्हात्रे 10-50 मीटर गोल्ड मेडल, लाँग जम्प गोल्ड 80 मीटर सिल्व्हर मेडल, मैत्रेयी दिपक पाटील इयत्ता 3 री या विद्यार्थिनीने सुयश प्राप्त करत लाँग जंपमध्ये तीसरा नंबर तसेच 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तीसरा नंबर मिळविला आहे. उरण जिमखाना तर्फे सर्व खेळाडू खेळत असुन या स्पर्धेत वरील सर्व खेळाडूंनी भाग घेतला व सुयश मिळविले. विद्यार्थ्याच्या कामगिरीमुळे सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उरण जिमखाण्याचे प्रशिक्षक दिलीप पाटील सरयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू खेळत आहेत.

Exit mobile version