विज्ञान प्रदर्शनात वाघोशी हायस्कूलचे यश

शेतकर्‍यांचा मित्र या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक

। पाली । प्रतिनिधी ।

सुधागड तालुक्याचे 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन खवली हायस्कुलमध्ये नुकतेच पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विद्यालय वाघोशी हायस्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी युवराज चंदू सागळे याने सहावी ते आठवी गटात शेतकर्‍यांचा मित्र हे मॉडेल बनवून शेतकरी व त्याच्या पिकाला हे मॉडेल कसे मदत करते याचे अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. त्याच्या या प्रतिकृतीसाठी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

या प्रतिकृतीसाठी शाळेतील विज्ञान शिक्षक संतोष गायकवाड, विकास निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जे.बी गोळे, मुख्याध्यापक राजेश गोळे, सहाय्यक शिक्षक नरेश शेडगे, शिक्षिका सुजाता गोळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version