गडारोहण स्पर्धेत कल्याण विभागाचे यश


| माणगांव | वार्ताहर |

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने रविवार (दि. 28) आयोजित करण्यात आलेल्या रायगड गडारोहण स्पर्धेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या रायगडविभागातील तीन शाळांनी यश प्राप्त केले.

या स्पर्धेत अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयाचा हर्ष तांबे द्वितीय क्रमांक, निशा जाधव तृतीय क्रमांक प्राप्त केला. जय जवान जय किसान माध्यमिक विद्यालय वाघेरी विद्यालयातील 14 वर्षे वयोगटात अरुणा ढेबे द्वितीय, 17 वर्षे वयोगटात प्रिया कोकरे द्वितीय तर आर्या कडू चतुर्थ क्रमांकानी विजेती. सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विदयालयातील अंश मोरे याचा 14 वर्ष वयोगटात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे पदाधिकारी तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वृंद यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version